मंचरमध्ये विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमध्ये विवाहितेला 
सासरच्यांकडून मारहाण
मंचरमध्ये विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

मंचरमध्ये विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

sakal_logo
By

मंचर, ता. २७ : आजारी असलेल्या मुलाची दवाखान्यातून मिळालेली कागदपत्रे आणण्यासाठी सासरी गेलेल्या पूनम जितेंद्र थोरात (वय ३३, रा.भक्तेमळा-मंचर, ता. आंबेगाव; सध्या रा. भोसरी, ता. हवेली) या विवाहितेला दगड व काठीने मारहाण केल्याची घटना मंचर येथे घडली. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात पतीसह एकूण सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पुनम थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पती जितेंद्र थोरात, सासरा मारुती बापू थोरात, सासू सरस्वती थोरात, दिर शैलेश थोरात, जाऊ वैशाली शैलेश थोरात, पुतण्या पवन शैलेश थोरात, पुतण्या जिवन शैलेश थोरात (सर्व रा. भक्तेमळा) यांनी शिवीगाळ करून लाकडी काठीने व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03410 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..