बिबट्याने मारली मंदिरावर बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याने मारली मंदिरावर बैठक
बिबट्याने मारली मंदिरावर बैठक

बिबट्याने मारली मंदिरावर बैठक

sakal_logo
By

मंचर, ता. १४ : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे (ता. आंबेगाव) येथे गावातील भर वस्तीत असलेल्या गोसावी बाबा मंदिराच्या छतावर बिबट्याने बैठक मारली. सतत पडत असलेल्या पावसामुळे बिबट्यांनी निवाऱ्यासाठी गावातील मंदिरे व अन्य घरांच्या आडोसेला वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. रात्रीसह दिवसाही बिबट्याचा वावर वाढल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

वडगाव काशिंबे परिसरात गावात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. येथे सध्या तीन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी दिली.ते म्हणाले "गेल्या आठवड्यात महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या उघड्या केबलला स्पर्श झाल्यामुळे शेळीची शिकार करून जाणारा बिबट्या मृत्युमुखी पडला होता. याव्यतिरिक्त अजून तीन बिबट्यांचा वावर गाव व परिसरात आहे. शेती कामावरही मोठा परिणाम झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे मजूर शेतात काम करत नाहीत.

राहुल डोके सागर डोके वैभव चव्हाण हे सकाळीच गावा तून जात असताना त्यांनी बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले. मंदिर परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना मोबाइलद्वारे संपर्क करून अलर्ट केले.

गावातच बिबट्याचा वावर वाढल्यामुळे लहान मुलांना व नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे वाटू लागले आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वन खात्याने गावठाणात व परिसरात ताबडतोब पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावेत.
- आकांक्षा गावडे-टेके

05908

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03464 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top