मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे स्पर्धा 
परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन 
मंचर येथे स्पर्धा 
परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन
मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन

मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन मंचर येथे स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण आयोजन

sakal_logo
By

मंचर, ता. १६ : राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे प्रशिक्षण सत्र राबविण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती सोमवारी (ता. २५ आँगस्ट) सकाळी दहा वाजता पोस्ट ऑफिसजवळ होणार आहेत. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां. ब. मोहिते यांनी दिली.

मोहिते पुढे म्हणाले, ‘‘१८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय, निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९७६६४३४१४१/९३२५८८८३२२ येथे संपर्क साधावा.

“कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ७६६ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे. आदिवासी युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.”
-दीपक ताथवडकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी, मंचर (ता.आंबेगाव)

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03467 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top