मंचरला ८१३ रक्तदात्यांनी रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला ८१३ रक्तदात्यांनी रक्तदान
मंचरला ८१३ रक्तदात्यांनी रक्तदान

मंचरला ८१३ रक्तदात्यांनी रक्तदान

sakal_logo
By

मंचर, ता.१७ : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात एक हजार ८१३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ता.३ जुलै ते १० जुलै या कालावधीत आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यातील मंचर, पारगाव शिंगवे, घोडेगाव, शिनोली, नारायणगाव, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, पेठ, राजगुरुनगर, पाबळ, जुन्नर येथे रक्तदान शिबिर झाले.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, धनाजी शिंदे, संदेश भेगडे, डॉ. ताराचंद कराळे, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे आदी मान्यवरांनी मंचर येथे शिबिराला भेट देऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते व रक्तदात्यांचे कौतुक केले.
यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष खामकर कुणाल साठे, महेश थोरात, बाबाजी चासकर, कुणाल बाणखेले, सुमित शिंनगारे, हेमंत लोखंडे आदि कार्यकर्त्यांनी व्यवस्था पहिली.
......................
05922

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03473 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top