पाणलोट क्षेत्राच्या विकासामुळे भागडी पाणीदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणलोट क्षेत्राच्या विकासामुळे भागडी पाणीदार
पाणलोट क्षेत्राच्या विकासामुळे भागडी पाणीदार

पाणलोट क्षेत्राच्या विकासामुळे भागडी पाणीदार

sakal_logo
By

मंचर, ता.२० : “भागडी (ता.आंबेगाव) गावाचा राज्य शासनाच्या आदर्शगाव योजनेत समावेश झाल्यानंतर पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था (मंचर) व गावकऱ्यांनी एकत्रितपणे केली. त्यामुळे गाव पाणीदार बनले. शेतकरी उन्हाळ्यातही भरघोस पिके घेतात. अन्य गावातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणारे काम येथे पाहावयास मिळते,” असे यशदाच्या सहायक प्राध्यापक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुचरीता थोरात यांनी सांगितले.

राज्य प्रशासनातील उच्चपदस्थ २८ अधिकारी सध्या यशदा संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी भागडीला भेट देऊन शिवारफेरी काढून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी औरंगाबादचे सहायक आयुक्त (तपास) राजेंद्र आहेरे, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानचे उपसंचालक श्याम सुंदर पटवारी, काटोल (नागपूर) गटविकास अधिकारी मनोहर बारापत्रे, राज्य एम एड प्राथमिक शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष राजू जाधव, उपसरपंच लता उंडे, विलास उंडे, ग्रामसेवक पी.जी नाईक, मुख्याध्यापक एस.बी साळवे, शेतकी अधिकारी आर डी घोळवे उपस्थित होते.
यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रात मुरमाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी आभार मानले. संदीप आदक, शंकर थिटे, किरण आगळे, सुदाम उंडे यांनी शेतीतील शाश्वत उत्पादनाबाबत माहिती दिली. नितीन आगळे अर्जुन बराटे यांनी स्वागत केले.

आदर्शगाव योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी गावातील ३५ कुटुंब रोजगारासाठी अन्य गावात गेली होती. पण सद्यस्थितीमध्ये ३०० हून अधिक अन्य गावातील मजूर गावात काम करतात. त्यांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीणे वापर होण्यासाठी ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पाणी टिकून राहते.
- काळूराम थिटे, अध्यक्ष, भागडी सोसायटी

आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामुळे गावाने दुष्काळ हद्दपार केला आहे. राज्यातील विविध शेतीमाल बाजारपेठांचा अभ्यास करूनच भागडी गावातील शेतकरी एकत्रित बसून कोणते पीक घ्यायचे याबाबत निर्णय घेतात. त्यानुसार तरकारी व भाजीपाला आदी पिकांची लागवड केली जाते. गावात करोडपती झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. तब्बल २५ टोलेजंग बंगले शेतकऱ्यांनी बांधले आहेत. शेती व्यवस्थित केली तर अजिबात तोट्यात जात नाही.
- गोपाळा गवारी, सरपंच आदर्शगाव भागडी (ता.आंबेगाव)

05934

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03479 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..