कळंब- चांडोली गटातून हरकती दाखल होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब- चांडोली गटातून हरकती दाखल होणार
कळंब- चांडोली गटातून हरकती दाखल होणार

कळंब- चांडोली गटातून हरकती दाखल होणार

sakal_logo
By

मंचर, ता. ३० : “पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २८) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत बारामती तालुक्यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यातही चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली गटात याआधी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षण असताना सुद्धा हा गट पुन्हा महिला अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित झाला आहे. वास्तविक पाहता येथे सर्वसाधारण पुरुष आरक्षण येणे अपेक्षित होते. सदर चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली गटातील आरक्षण सोडत पुन्हा काढावी.” अशी मागणी या गटातील अनेक जण हरकतीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सोमवारी (ता. १ ऑगस्ट) रोजी करणार आहेत. येथील हरकतीची दाखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा, अशी मागणी या भागातून केली जात आहे. या गटात आरक्षण सर्वसाधारण पुरुष असे अपेक्षित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना शिंदे गट, भाजपचे कार्यकर्ते हरकत नोंदविण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्राकार पद्धतीने आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. यापूर्वी चार वेळा झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाचाही आढावा घ्यावा लागेल. त्यामुळे चांडोली -कळंब गटातील नागरिकांना आरक्षणाबाबत न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाली आहे. येथील आरक्षणाबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेते या विषयी नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान याबाबत आंबेगाव- जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘आरक्षणाबाबत हरकती प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जाईल.’’

आतापर्यंत लागू झालेले आरक्षण
सन २००२ खुला प्रवर्ग गट, सन २००७ अनुसूचित जमाती (एसटी) पुरुष, सन २०१२ इतर मागासवर्गीय (ओबीसी), सन २०१७ सर्वसाधारण महिला, सन २०२२ अनुसूचित जमाती(एसटी) महिला असे आरक्षण लागू आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03516 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..