मंचर येथील रोड रोमियोंवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथील रोड रोमियोंवर कारवाईची मागणी
मंचर येथील रोड रोमियोंवर कारवाईची मागणी

मंचर येथील रोड रोमियोंवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

मंचर, ता. ७ : मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालय परिसरात रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शिष्ठमंडळाने मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज चौकातून मातंग वस्ती ते जुना पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच अवजड वाहने पार्किंग केलेली असतात. या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच ये-जा असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. महात्मा गांधी विद्यालय परिसरात शालाबाह्य अनेक तरुण मोटरसायकली घेऊन शाळा भरताना व सुटताना ये-जा करतात. याबाबत पोलिस खात्याने लक्ष द्यावे. यावेळी शहराध्यक्ष जागृती महाजन, उपशहराध्यक्ष सगुणा बाणखेले, सरचिटणीस छाया थोरात, ओबीसी तालुका अध्यक्ष सुरेश अभंग, मंचर शहर उपाध्यक्ष योगेश बोऱ्हाडे यांच्या हस्ते निवेदन दिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03547 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..