हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा: पष्टे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा: पष्टे
हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा: पष्टे

हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा: पष्टे

sakal_logo
By

मंचर, ता. १० : मंचर शहरातील नागरिकांनी आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हावे. ज्या कुटुंबीयांना आपल्या घरावर ध्वज लावायचा आहे. त्यांनी मंचर नगरपंचायत येथे २५ रुपये शुल्क भरून ध्वज घ्यावा, असे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी केले.
पष्टे म्हणाले, ‘‘सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंपूर्ण करावी. अभियान राबविताना प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे, तिरंगा झेंडा फडकविण्याला केशरी रंग वरच्या बाजूने असावा, अर्धा झाकलेला फाटलेला, कापलेला, झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावू नये, तिरंगा झेंडा उतरवताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरावा, अभियान कालावधीनंतर झेंडा कोठेही इतरत्र फेकला जाऊ नये, याची काळजी घ्यावी. सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03559 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..