जमीन फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा
जमीन फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा

जमीन फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा

sakal_logo
By

मंचर, ता. १० : भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी चंद्रकांत निराभाऊ भोर यांच्यासह तीन शेतकऱ्यांची अडीच एकर जमीन रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी केली. त्यासाठी काही रोख रक्कम दिली. मात्र, इतर रकमेचे दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. या प्रकरणी शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचा दावा घोडेगाव न्यायालयात दाखल केला होता. याप्रकरणी न्यायाधीश बी. डी. चोखट यांनी खरेदी खताद्वारे जमीन घेणारे संजय वामनराव बाणखेले (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना सहा महिन्यांचा साधा कारावास शिक्षा व जमीन विक्रीची किंमत, व्याज व इतर खर्च मिळून तीन कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले.
चंद्रकांत निराभाऊ भोर, बाळू निराभाऊ भोर, रामदास निराराभाऊ भोर, सुमन सूर्यकांत काळे यांना आर्थिक अडचण आल्याने त्यांनी त्यांची भोरवाडी येथे असलेली अडीच एकर जमीन विक्रीसाठी काढली होती. ती संजय बाणखेले यांनी दोन कोटी नऊ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले. त्यानुसार घोडेगाव येथे २४ एप्रिल २०१५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर खरेदीखत केले. त्यावेळी बाणखेले यांनी भोर कुटुंबीयांना १५ लाख रुपये रोख व उर्वरित एक कोटी ९४ लाख रुपयांचे चार धनादेश अशोक नागरी सहकारी बँकेचे दिले. ते भोर कुटुंबीयांनी ७ डिसेंबर २०१६ रोजी बँकेत भरले, पण ते वटले नाहीत.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोर कुटुंबीयांनी अॅड. अर्चना गायकवाड यांच्या माध्यमातून बाणखेले यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली. मात्र, त्यानंतरही बाणखेले यांनी पैसे न दिल्याने सदर दावा घोडेगाव न्यायालयात दाखल केला. न्यायाधीश चोखट यांनी सर्व साक्षी पुरावे तपासून निकाल दिला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03563 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..