पोलिसांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी पाठलाग करून 
चोरट्याला पकडले
पोलिसांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले

पोलिसांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले

sakal_logo
By

मंचर, ता. २४ : मंचर (ता. आंबेगाव) शहरात भरवस्तीत रविवारी (ता. २१) पहाटे चार ठिकाणी दुकानांमध्ये व एक मोटार सायकल चोरी करून पळून जाताना चार पैकी एका चोरट्याला पाठलाग करून पकडण्यात मंचर पोलिसांना यश आले आहे. मोहसीन हानीफ शेख (रा. विश्रांत वाडी प्रतीक नगर येरवडा, पुणे) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. पळून गेलेल्या अन्य चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथक कार्यरत आहे, असे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.
सुनील बबन खेडकर यांच्या कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चार हजार १५० रुपये, प्रशांत मोराडे यांचे हॉटेलमधून २० हजार रोख, दिलीप महाजन यांच्या किराणा स्टोअर्समधून सात हजार रुपये, सलमान अतार यांच्या दुकानासमोरून २५ हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण ५६ हजार १५० रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरला होता. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश डावखर, पोलिस सुनील काटे, दिनेश माताडे हे गस्त घालत असताना तिथे त्यांना काहीजण संशयास्पद आढळले. पोलिसांना पाहताच ते पळून चालले होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी मोहसीन शेख याला पकडले. अन्य तीनजण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. शेख याला पोलिस खाक्या दाखविल्यानंतर त्याने सागर गायकवाड, यश व एक मित्र (पूर्ण नावे माहीत नाही) अशी चार चोरट्यांची नावे सांगितली. यशने मोटरसायकल चोरून नेल्याचेही सांगितले. या प्रकरणी सुनील खेडकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अन्य पळून गेलेले आरोपी खडकी विश्रांतवाडी भागातील आहेत. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे असे डावखर यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03609 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..