वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव काशिंबेग येथे
बैलगाडा शर्यतींचे आयोजन
वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन

वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन

sakal_logo
By

मंचर, ता. २६ : ‘‘श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे गणेश फेस्टिवल २०२२निमित्त शनिवार (ता. २ सप्टेंबर) ते रविवार (ता. ४ सप्टेंबर) या कालावधीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते चार क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडा मालकांना तीन लाख ५३ हजार रुपये रोख रक्कम विभागून, सहा मोटर सायकल, २१ जुंपते बैलगाडे व तीन सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. नावनोंदणी रविवारी (ता. २८) रोजी होणार आहे,’’ अशी माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्र आहे. गणेशोत्सवात गणेश फेस्टिवलचे हे १७ वे वर्ष आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे शर्यती बंद होत्या. गणेश फेस्टिवलची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शर्यतीसाठी घाट सुसज्ज करण्यात आला आहे. “वडगाव काशिंबेग येथे श्रीराम मंदिरात शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांनी नावनोंदणी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत करावी,” असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03616 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..