‘किसान सन्मान’साठी ई-केवायसीला मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘किसान सन्मान’साठी 
ई-केवायसीला मुदत
‘किसान सन्मान’साठी ई-केवायसीला मुदत

‘किसान सन्मान’साठी ई-केवायसीला मुदत

sakal_logo
By

मंचर, ता. २८ : “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेचा पुढील लाभ होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बुधवार (ता. ३१) पर्यंत करणे बंधनकारक आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीला पी. एम किसान सन्मान योजना निधीचा पुढील हप्ता दिला जाणार नाही. सर्व लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी,” असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘‘www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ॲपमध्ये ओटीपीद्वारे मोफत ई- केवायसी करता येईल. तसेच नजीकच्या माहिती सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली ई- केवायसी तत्काळ करून घेता येईल. अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा’’

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03624 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..