मंचर येथे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न
मंचर येथे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

मंचर येथे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

मंचर, ता.३ : येथील (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुन्या रस्त्यावर दारूच्या नशेत सूर्यकांत दत्तात्रेय कराळे (वय ४०,रा.कारेगाव, ता.आंबेगाव) याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले व पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंचर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविली व त्यास मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील उपारासाठी पुणे येथे नेले आहे.
कराळे यांनी कपड्यावर पेट्रोल ओतून घेतले व माचीसच्या काडीने पेटून घेतल्याने भडका उडाला. आरडाओरडा व गर्दी झाल्याचे पाहून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलिस हवालदार राजेश नलावडे, रामदास तनपुरे, दिनेश माताडे, अमर वंजारे व स्थानिक नागरिकांनी तत्काळ कपड्यांवर पाणी टाकले. त्यामुळे आग आटोक्यात आली. ताबडतोब घटनास्थळी रुग्णवाहिका चालक गौरव बारणे आले. मंचर पोलिसांनी सदर घटना कराळे यांच्या कुटुंबीयांना कळविली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03653 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..