पोखरी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३२ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोखरी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३२ कोटी
पोखरी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३२ कोटी

पोखरी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३२ कोटी

sakal_logo
By

मंचर, ता. ३ : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात पोखरी (ता. आंबेगाव) येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३२ कोटी ८४ लाख ७३ हजार रुपये निधी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मंजूर झाला आहे. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल.” अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील म्हणाले, “आंबेगावच्या आदिवासी डोंगरी भागातील पोखारीसह अन्य ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी केली होती. त्यानुसार प्रस्ताव पाठविला होता. मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग पुणे यांनी संदर्भ क्रमांक ९ अन्वये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केली होती. प्रस्तुत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या २४ मे २०२२ रोजीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत ३० ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरीचा अध्यादेश काढला आहे.”

“पोखरी येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे आदिवासी भागतील अनेक कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होणार आहे. ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नळ योजनेच्या कामाला सुरुवात होईल. नळ योजना मंजुरीसाठी वळसे पाटील यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.”
-सुभाष मोरमारे, माजी सभापती समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03655 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..