मंचर बसस्थानकातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर बसस्थानकातील
अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
मंचर बसस्थानकातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

मंचर बसस्थानकातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

sakal_logo
By

मंचर, ता. ६ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मंचर (ता. आंबेगाव) येथील बसस्थानकावर अंदाजे ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी (ता. ५) आढळला. सदर व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करत होता. या व्यक्तीची हालचाल बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिवहन महामंडळाचे गुलाब तिटकरे यांनी मंचर पोलिसांना कळवले. पोलिस नाईक तानाजी हगवणे, आर. बी. मोमीन यांनी रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे सदर व्यक्तीला दाखल केले. डॉक्टरांनी या व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी मंचर पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक-०२१३३ २२३१५९) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03677 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..