चांडोलीत कौलारू घर कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांडोलीत कौलारू घर कोसळले
चांडोलीत कौलारू घर कोसळले

चांडोलीत कौलारू घर कोसळले

sakal_logo
By

मंचर, ता.१२ : “चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.११) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कौलारू घर कोसळले. ओढ्यांना आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतजमिनीतील उभ्या पिकांसह माती वाहून गेली आहे. काही शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या असून विहिरी गाडल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव इंदोरे वमाजी सरपंच बी.टी बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे

गोविंद बांगर, आहिलू गोविंद बांगर यांच्या गट क्रमांक २१४ मधील दोन सामाईक विहिरी कोसळल्या. मारुती गणा इंदोरे यांच्या घराची भिंत पडली. संजय गणपतराव इंदोरे यांच्या विहिरीचा काही भाग कोसळला आहे. अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पंधरा-वीस दिवसापूर्वी लागवड केलेले ऊस पीकही अडचणीत आले आहे. भाजीपाला व तरकारी पिकालाही फटका बसला आहे.
चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) कामगार तलाठी एस .बी .शेवाळे यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. “शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही केली जाईल.”असे शेवाळे यांनी सांगितले.
.......................
06353

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03697 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..