कृषी विभागातर्फे पंचनाम्यास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विभागातर्फे पंचनाम्यास प्रारंभ
कृषी विभागातर्फे पंचनाम्यास प्रारंभ

कृषी विभागातर्फे पंचनाम्यास प्रारंभ

sakal_logo
By

मंचर, ता.१३: मंचर शहर व परिसरात शनिवारपासून (ता.१०) सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे सोयाबीन, गाजर, मका, फुले, मेथी, कोथंबीर व तरकारी मालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी खात्याने पंचनामे सुरु केले असून मंगळवार (ता.१३) दुपारपर्यंत ९० शेतकऱ्यांचे ८५ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांबरोबर बांध व जमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
झालेला पाऊस हा शेती पिकांना नुकसान करणारा ठरत आहे. शेतातील खुरपणी किंवा तरकारी लागवडीची कामे रखडली आहेत. सद्यस्थितीत अजून पाऊस चालूच राहिल्यास शेती पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीतीही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. हवामान खात्याने शनिवार (ता.१७) पर्यंत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांना मंचर परिसरात शेतीपिकासह नुकसान झाल्याची माहिती दिली. त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याची हि मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, कृषी सहाय्यक राजश्री पवार यांनी पंचनाम्याचे काम सुरु केले आहे.
एस कॉर्नर, लोंढेमळा, गांजाळे मळा, भीलौढीवस्ती या भागात संजय थोरात, नवनाथ थोरात यांनी कृषी कर्मचाऱ्यासमवेत पाहणी दौरा केला. मनोज रामदास बेंडे, कालिदास गांजाळे, अरुण लोंढे, कैलास गांजाळे, अनिल थोरात, आनंदा गांजाळे, रामदास बढे, अनिल गांजाळे, बाळासाहेब गांजाळे, श्रीराम गांजाळे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

06356

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03698 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..