सातगावात फुलोऱ्यातील बटाटा धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातगावात फुलोऱ्यातील बटाटा धोक्यात
सातगावात फुलोऱ्यातील बटाटा धोक्यात

सातगावात फुलोऱ्यातील बटाटा धोक्यात

sakal_logo
By

मंचर, ता. १५ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात दहा दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे खरीप हंगामातील फुलोऱ्यात आलेले सहा हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक धोक्यात आले आहे. बटाटा जमिनीतच सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतात साचलेले पाणी काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पावसाने उघडीप न दिल्यास हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
आदर्शगाव कुरवंडी, पेठ, थुगाव, कारेगाव, भावडी, पारगाव तर्फे खेड, कोल्हारवाडी आदी गावे बटाट्याचे आगर म्हणून ओळखली जातात. यापूर्वी दरवर्षी दहा हजार एकर क्षेत्रात खरीप हंगामात शेतकरी बटाटा लागवड करत होते. पण बाजारभावात स्थिरता नसल्याने व उत्पादन खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून बटाटा लागवड क्षेत्रात घट होत चालली आहे. सोयाबीन, मका, वटाणा आदी पिकाकडे शेतकरी वळला असल्याने या पिकाचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे. असे पारगाव येथील बटाटा उत्पादक भाऊसाहेब सावंत पाटील यांनी सांगितले.

पावसामुळे अडचणी
आंबेगाव तालुक्यात ता.२१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच हजार ७०० एकर क्षेत्रातील पीक फुलोऱ्यात आहे. जमिनीत बटाट्याची वाढ सुरू झाली आहे. पण सुरू असलेला पाऊस अडचणीचा ठरत आहे. पिकात साचलेले पाणी काढून देण्याचे काम सुरू आहे, असे पेठ येथील शेतकरी राम तोडकर यांनी सांगितले.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. आता तो काढणी योग्य झाला आहे. पण बटाटा काढणीचे काम पावसामुळे रखडले आहे. परिणामतः ३०० एकर क्षेत्रातील बटाटे जमिनीतच सडण्याची भीती आहे.
- अशोक बाजारे, बटाटा उत्पादक शेतकरी, भावडी (ता. आंबेगाव)


सातगाव पठारभागात गेली आठवडाभर सततच्या पावसाने बटाटे काढणीची कामे खोळंबली आहेत. चिखल झाल्यामुळे पिकात जाता येत नाही. काही शेतकऱ्यांचे बटाटे खराब झाले आहेत. कृषी विभागाने या परिसराचा पाहणी दौरा करून ताबडतोब पंचनामे सुरु करावेत.”
- मनीषा तोत्रे, सरपंच आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव)

06364

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03702 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..