एकलहरे येथे ई-लर्निंग सुविधा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकलहरे येथे ई-लर्निंग सुविधा सुरू
एकलहरे येथे ई-लर्निंग सुविधा सुरू

एकलहरे येथे ई-लर्निंग सुविधा सुरू

sakal_logo
By

मंचर, ता. १७ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुताती एंटरप्राइजेस, रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट व नारायणगाव हायवे यांच्या वतीने इ-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सानेगुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. ई.-लर्निंगचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्टचे संचालक पंकज पटेल व सरपंच राणी खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच दीपक डोके, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष पांडुरंग डोके, विकास शिंदे, मंचर रोटरीचे सचिव अरुण चिखले, सुशील देठे, महेंद्र डोके आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मनीषा कानडे, रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष आदिनाथ थोरात, शिक्षणतज्ञ रोटरीयन रामभाऊ सातपुते यांची मनोगते झाली. प्रास्ताविक बाळासाहेब कानडे व सूत्रसंचालन प्रदीप चासकर यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03711 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..