वडगाव काशिंबे, वाळुंजवाडी येथे शांततेत मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव काशिंबे, वाळुंजवाडी येथे शांततेत मतदान
वडगाव काशिंबे, वाळुंजवाडी येथे शांततेत मतदान

वडगाव काशिंबे, वाळुंजवाडी येथे शांततेत मतदान

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व वाळुंजवाडी (ता. आंबेगाव) या दोन ग्रामपंचायतीत प्रथमच जनतेतून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे रविवारी (ता. १८) निवडणूक मतदान होण्यासाठी सरपंच पदाचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरु होती. या दोन्ही गावात अनुक्रमे ८२. ५ व ८२ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून सरपंच पदासाठी महेश डोके व वैभव पोखरकर यांच्यात सरळ लढत आहे. येथे रिंगणात असलेले आशिष डोके यांनी पत्रक काढून महेश डोके यांना पाठिंबा दर्शवला आहे. सदस्य पदाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सरपंच पदासाठी ८२.५ टक्के मतदान झाले आहे.
प्रथमच अस्तित्वात आलेल्या वाळुंजवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण आहे. सरपंच पदासाठी नवनाथ वाळुंज, नितीन वाळुंज, बाळासाहेब वाळुंज हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य सात जागांसाठी तेरा उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत आहे. येथे तीन पॅनेल आपले नशीब आजमावत आहे. सरपंच पदासाठी ८२ टक्के मतदान झाले आहे. सोमवार (ता. १९) रोजी घोडेगाव येथे मतमोजणी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होईल.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03721 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..