मंचरला रानभाज्यांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला रानभाज्यांचे प्रदर्शन
मंचरला रानभाज्यांचे प्रदर्शन

मंचरला रानभाज्यांचे प्रदर्शन

sakal_logo
By

मंचर, ता. २१ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आंबेगाव जुन्नर व खेड तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्री घाटावर दुर्मिळ नैसर्गिक पीक असलेल्या शेवगा, पेवा, एकपान, अळू, तेर, कुड्याच्या शेंगा, टायकाळा, दिंडा, घोटवेल, कुरडू, सुरण, वळं, घोळ, तेरा, टेंभरे, मोह फुले व फळे, तेलपट, कोळू, लोत, भोकर, मोखा, भारंगी, काटे-माठ, कुसरा, कुळू अशा अनेक रानभाज्या या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणून प्रदर्शन भरविले आहे. यासाठी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. बोलभट व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दुर्मिळ रानभाज्यांची ओळख विद्यार्थी, पालक व नागरिकांना व्हावी. या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03729 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..