मंचर येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक
मंचर येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक

मंचर येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक

sakal_logo
By

मंचर, ता. २२ : येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २२) मंचर शहरातून कर्मवीरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढली. ढोल, लेझीम, झांज, टिपरी, वारकरी, विविध साडी, घागरा व फेटा अशा वेशभुषाने मिरवणूक लक्षवेधी ठरली.
या मिरवणुकीमध्ये महात्मा गांधी विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, रयत इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य राजाराम बाणखेले, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, संजय बाणखेले, ॲड. बाळासाहेब पोखरकर, संतोष बाणखेले, ॲड. अविनाश राहणे, राजू सोमवंशी, भीमराव बाणखेले, सुहास बाणखेले आदींनी मिरवणुकीचे स्वागत केले. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी.कानडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, जमील शेख, मुख्याध्यापिका सलमा शेख आदी मान्यवर यामध्ये अग्रभागी होते. याप्रसंगी विज्ञान, रांगोळी, कला प्रदर्शन, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. मिरवणुकीची लक्ष्मण रोडे, दिलीप चौधरी, दत्तात्रेय चासकर, विशाल पोंगडे, उज्वला बाणखेले यांनी व्यवस्था पहिली.
ssociated Media Ids : MAC22B06425, MAC22B06426

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03734 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..