मोटरसायकल व लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटरसायकल व लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक
मोटरसायकल व लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक

मोटरसायकल व लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक

sakal_logo
By

मंचर ता. २३ : मंचर शहरातील सर्वज्ञ मेडिकल व रुबाब कलेक्शन या दोन दुकानांतून अनुक्रमे लॅपटॉप, कपडे, लक्ष्मी रस्त्यावरील स्टार परमिट रूम अँड बार, श्रीकांत किराणा स्टोअर्समधून रोख रक्कम व पल्सर मोटरसायकल चोरून नेणाऱ्या यशदीप गोविंद कोंढार (वय २४, रा. कळसगाव, येरवडा, पुणे) व त्याच्यासमवेत असलेल्या अल्पवयीन साथीदाराला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटरसायकल व लॅपटॉप हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. या आरोपींवर पुण्यातील विश्रांतवाडी व येरवडा पोलिस ठाण्यांत विविध प्रकारचे चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मंचर शहरातील चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत असल्याचेही होडगर यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) : मंचर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतलेला आरोपी.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03739 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..