माहिती अधिकार कार्यकर्ता इचकेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहिती अधिकार कार्यकर्ता इचकेला अटक
माहिती अधिकार कार्यकर्ता इचकेला अटक

माहिती अधिकार कार्यकर्ता इचकेला अटक

sakal_logo
By

मंचर, ता. २३ : ‘‘गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेला व पोलिसांना चकवा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता उमेश नामदेव इचके (रा. नागापूर, ता. आंबेगाव) याला मंचर पोलिसांनी शिताफीने अटक केली. घोडेगाव न्यायालयाने आरोपीला शनिवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे,’’ अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘माहिती आधिकार कार्यकर्ता म्हणून इचके याने मंचर व पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागापूर, रांजणी, वळती या भागांतील सामान्य नागरिकांना कायद्याचा व माहिती अधिकार कायद्याचा धाक दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. काही जणांकडून तर त्याने खंडणीही घेतली होती. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली. तक्रारीची शहानिशा करून त्याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे व नारायणगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. पोलिस त्याच्या मागावर होते पण तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. बुधवारी (ता. २१) इचकेला अटक करण्यात आली.

माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून उमेश नामदेव इचके याने कोणाला धमकी किंवा आर्थिक फसवणूक केली असल्यास नागरिकांनी न घाबरता मंचर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
- सतीश होडगर, पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03741 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..