मंचर येथे अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे अपघातात
दुचाकीस्वार तरुण ठार
मंचर येथे अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार

मंचर येथे अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार

sakal_logo
By

मंचर, ता. ३० : मंचर (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील होंडा शोरूमसमोर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वार भरत रवींद्र निकम (वय २५, रा. चैतन्य रेसिडेन्सी-मोरडेवाडी, मंचर) या तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत मंचर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता. ३०) हा अपघात झाला. याबाबत रवींद्र निकम याचे मामा संतोष राजाराम मोरे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रवींद्र हा मंचर येथून हिरो कंपनीच्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच १४ ईजी १३३८) मोरडेवाडी येथे जात होता. त्यावेळी होंडा शोरूमसमोर अज्ञात वाहनाची त्याला समोरून धडक बसली. या अपघातात रवींद्र निकम त्याच्या डोक्याला, हातापायाला गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.