मंचरला मोफत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला मोफत आरोग्य शिबिर
मंचरला मोफत आरोग्य शिबिर

मंचरला मोफत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

मंचर, ता. ३०: “माता सुरक्षित घर सुरक्षित” या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर राबविले आहे. हे शिबिर शनिवार (ता. १) ते मंगळवारी (ता. ४) सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा.” असे आवाहन मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले.

देवमाने पुढे म्हणाले “गरोदर माता, स्त्री रोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदू, फुफ्फुस, कॅन्सर, किडनी, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग, एचआयव्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग, लहान मुलांचे आजार व इत्यादी सर्व आजारांचे तपासणी व उपचार केले जाणार आहे.”

“निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा, इतर सल्ला व मार्गदर्शन किशोरवयातील मुला-मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या याविषयी सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे. रक्त, लघवी, एक्स-रे व ई.सी.जी. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील.”अशी माहिती घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदू वणवे यांनी दिली