''आंबेगाव खरेदी-विक्री संघाचे काम पारदर्शक'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आंबेगाव खरेदी-विक्री संघाचे काम पारदर्शक''
''आंबेगाव खरेदी-विक्री संघाचे काम पारदर्शक''

''आंबेगाव खरेदी-विक्री संघाचे काम पारदर्शक''

sakal_logo
By

मंचर, ता.३ : “आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, खते, औषधे, पशुखाद्य योग्य बाजारभावाने उपलब्ध करून देण्याचे काम पारदर्शकपणे आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ संस्था करत आहे. ही संस्था सर्वात जुनी असून, अन्य सहकारी संस्थांना नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.” असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. संघाचे अध्यक्ष भगवान रामभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
भगवानराव वाघ म्हणाले, “सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संघाला `अ` वर्ग मिळाला असून नऊ लाख ५९ हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे. शेतकऱ्यांना वेळेत व योग्य बाजार भावाने खते व बियाणे उपलब्ध करून दिली जातात. काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानेही चालविली जातात. शेतकरी परिवाराची सेवा करणारा खरेदी विक्री संघ असा संघाचा नावलौकिक आहे.”
यावेळी भगवानराव बेंडे, देवदत्त निकम, विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, डॉ.वर्षा शिवले, सखाराम काळे, सचिन भोर, गणपतराव इंदोरे, भरत चिखले, बाबासाहेब खालकर, भरत फल्ले उपस्थित होते.
ज्ञानेश्वर गावडे, कैलासबुवा काळे, शांताराम हिंगे, दादाभाऊ पोखरकर आदींनी चर्चेत भाग घेतला. खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन व अहवाल वाचन व्यवस्थापक गणेश हुले यांनी केले. माजी अध्यक्ष मधुकर बोऱ्हाडे यांनी आभार मानले.
06552