झेंडू बांधावरच १०० रुपये प्रतिकिलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू बांधावरच १०० रुपये प्रतिकिलो
झेंडू बांधावरच १०० रुपये प्रतिकिलो

झेंडू बांधावरच १०० रुपये प्रतिकिलो

sakal_logo
By

मंचर, ता.३ : यंदा दुपटीपेक्षा बाजारभाव वाढून १०० रुपये प्रतिकिलो इतका बांधावर मिळत आहे. फूल बाजारभावात कमालीची वाढ झाली आहे. गेली दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी फुलशेती कोलमडली आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे. दसऱ्यापर्यंत बाजारभाव अजून कडाडतील,” अशी शक्यता मंचर येथील फूल विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झेंडू, अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती आदी फुलांचे भरघोस उत्पादन घेतात. पण यावर्षी अनेक गावात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली. परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही.” असे तांबडेमळा येथील फूल उत्पादक शेतकरी महादू तांबडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, “भोसरी, पुणे, मंचर येथील व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावरून १०० रुपये बाजारभावाने झेंडू (कलकत्ता जातीचा) फुलांची खरेदी सोमवारी (ता.३) केली आहे. कलकत्ता जातीची फुले चार दिवस टिकतात.त्यामुळे त्यांची मागणी जास्त आहे.
“आंबेगाव तालुक्यात फुलांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तांबडेमळ्यातून दररोज तीन टनापेक्षा अधिक झेंडूच्या फुलांची खरेदी पुणे, मुंबई,मंचर, नारायणगाव, लोणावळा भागातील व्यापारी वर्गाकडून केली जाते.” असे शेतकरी निशानंद भोर व सुनील भोर यांनी सांगितले.

नवरात्रीमुळे रविवारपर्यंत ५० ते ६० रुपये बाजारभाव होता. मात्र, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज १५० रुपये बाजारभावाने झेंडूची विक्री केली आहे. सर्वच फुलांचे बाजारभाव वाढल्याने ग्राहकही मोठ्या हाराऐवजी लहान आकाराच्या हाराला पसंती देत आहेत.
- रतन निघोट, फूल विक्रेते,मंचर (ता. आंबेगाव)

फूल विक्री प्रतिकिलो दर
झेंडू ......१४० रुपये
पांढरी शेवंती.....२०० ते २२५ रुपये
गुलछडी / रजनीगंधा....३०० रुपये
गुलाब.... प्रती २० रुपये
अस्टर...२०० रुपये शेकडा.