शेवाळवाडीत सीएनजी पपांवर कामगार व ग्राहकांत मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेवाळवाडीत सीएनजी पपांवर
कामगार व ग्राहकांत मारामारी
शेवाळवाडीत सीएनजी पपांवर कामगार व ग्राहकांत मारामारी

शेवाळवाडीत सीएनजी पपांवर कामगार व ग्राहकांत मारामारी

sakal_logo
By

मंचर, ता. ३ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शेवाळवाडी (ता. आंबेगाव) येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्याच्या कारणावरून पंपावरील कर्मचारी व गॅस भरण्यासाठी आलेले युवकांमध्ये तुंबळ मारामारी झाली. एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या प्रकरणी मंचर पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत ग्राहक धनेश शरद टेमकर (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) व पंपावरील कर्मचारी ऋषिकेश गोरक्ष निघोट (रा. निघोटवाडी, ता. आंबेगाव) यांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिली. टेमकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एस. के इंटरप्रायजेस सीएनजी पंपावर स्विफ्ट मोटारीमध्ये (क्र. एमएच १४ केएफ ९२३६) गॅस भरण्यासाठी ते व वैभव संजय टेमकर हे गेले होते. त्यावेळी कर्मचारी ऋषिकेश निघोट याने वाहन उभी करण्याच्या कारणावरून अपमानकारक शब्द वापरले. त्यातून झालेल्या भांडणातून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अवसरी खुर्द येथे घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ऋषिकेश निघोट याच्यासह किरण विलास सैद, गणेश ऊर्फ गनी निघोट, विशाल निघोट, निखिल निघोट, अतुल निघोट, हेमंत निघोट, अंकुश निघोट, सूरज निघोट, कुणाल निघोट, भूषण निघोट, पूजन निघोट, रोहित निघोट, ऋषिकेश निघोट व किरण सैद (सर्व रा. निघोटवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ऋषिकेश निघोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गॅस भरण्यासाठी वाहनांची रांग होती. त्यावेळी स्विफ्ट मोटार घेऊन आलेले धनेश टेमकर, अनिकेत टेमकर व तीन अनोळखी व्यक्ती होते. त्यांना, ‘ही रांग व्यावसायिक वाहनांसाठीची आहे. तुम्ही बाजूच्या रांगेत गाडी घेऊन जा,’ असे सांगितले. त्यावेळी भांडणे झाली. टेमकर याच्यासह मोटारीतील इतरही खाली उतरले. त्यांनी निघोट यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व हातातील स्टील कडीने मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी धनेश शरद टेमकर, वैभव संजय टेमकर, व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.