मंचर नगरपंचायतीने जागांचे करार नवीन करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर नगरपंचायतीने जागांचे करार नवीन करण्याची मागणी
मंचर नगरपंचायतीने जागांचे करार नवीन करण्याची मागणी

मंचर नगरपंचायतीने जागांचे करार नवीन करण्याची मागणी

sakal_logo
By

मंचर, ता. ८ : ‘‘मंचर नगरपंचायतीने ताबडतोब अतिक्रमणे हटवावी व नगरपंचायतीच्या मालकीच्या सर्व जागांचे जुने करार नवीन स्वरूपात करून घ्यावेत,’’अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे आंबेगाव तालुका संघटक सलीम बशीर इनामदार यांनी निवेदनाद्वारे मंचर नगरपंचायतीकडे केली आहे.
अनेक ठिकाणच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. नगरपंचायतीच्या मालकीच्या अनेक जागा, दुकाने व गाळे नाममात्र भाडेकराराने दिल्या आहेत. ज्यांच्या नावे जागेचे करार आहेत. त्यांनी स्वतः व्यवसाय करणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी अन्य लोकांना भाडेतत्त्वावर जागा, गाळे व दुकाने दिली आहेत. मंचर नगरपंचायतीला ५०० ते ३०० रुपये दरमहा भाडे मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र संबंधित लोक अन्य व्यक्तीसोबत भाडेकरार करून दरमहा नऊ ते दहा हजार रुपये भाडे घेतात. यामध्ये नगरपंचायतीचा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत आहे. नगरपंचायतीने सध्या वापरत असलेल्या व्यक्तींकडून थेट भाडेकरार करून घेतल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळेल. वीज बिल, नळपट्टी, सफाई आदी खर्च भागवणे शक्य होईल. याबाबत त्वरित कार्यवाही न केल्यास १५ ऑक्टोबरला मंचर नगरपंचायतीपुढे ढोल वाजवून आंदोलन केले जाईल,’’ असा इशारा निवेदनात इनामदार यांनी दिला.