उत्तराखंडमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तराखंडमध्ये अडकलेल्यांना
मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे दिलासा
उत्तराखंडमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे दिलासा

उत्तराखंडमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे दिलासा

sakal_logo
By

मंचर, ता. १२ ः आंबेगाव, खेड, जुन्नर तालुका व भोसरी परिसरातील शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक चारीधाम यात्रेसाठी उत्तराखंड राज्यात गेले असता यमुना जेट्टी -बालकोट (जिल्हा उत्तरकाशी) रस्त्यावर दरड कोसळल्याने मंगळवारी (ता. ११) रात्री अडकले होते. त्यांची सुटका करून निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झाली. ‘अन्यथा, आमचे अतोनात हाल झाले असते’ अशी माहिती यात्रेकरू लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी जयराम शंकर पोखरकर (रा. पिंपळगाव खडकी. ता आंबेगाव) यांनी सकाळ-सरकारनामा’शी बोलताना दिली.

पोखरकर म्हणाले, ‘‘मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता वाहतूक कोंडी झाल्याने असंख्य गाड्या अडकल्या होत्या. रात्री अकरा वाजले तरीपण वाहतूक सुरू झाली नव्हती. पिण्यासाठी असलेले पाणीही बसमधून संपले होते. पावसात बाटल्या धरून पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भुकेने सर्वजण व्याकूळ झाले होते. दरम्यान, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांना फोन करून ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत यांच्याबरोबर संपर्क केला. थोड्यावेळाने मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी अभिजित दरेकर यांनी फोन करून ‘मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंड प्रशासनाची संपर्क साधून व्यवस्था केल्याचे’ नमूद केले. थोड्या वेळातच पोलिस व महसूल खात्यातील अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी जवळच असलेल्या हॉटेलमध्ये भोजन व निवासाची व्यवस्था केली.’’