श्री कुलस्वामी सोसायटीत सत्ताधारी पॅनेलचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री कुलस्वामी सोसायटीत
सत्ताधारी पॅनेलचा विजय
श्री कुलस्वामी सोसायटीत सत्ताधारी पॅनेलचा विजय

श्री कुलस्वामी सोसायटीत सत्ताधारी पॅनेलचा विजय

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक सभासद व राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या श्री कुलस्वामी को ऑप क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष शंकर पिंगळे व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री कुलस्वामी खंडेराय संस्थापक पॅनेलने १५ संचालकांच्या जागांवर मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. विरोधी श्री कुलस्वामी संस्थापक सहकार पॅनेलचा पराभव झाला.
नेरूळ येथील आग्री कोळी भवन सभागृहात सोमवारी (ता. १७) उशिरा निकाल जाहीर झाला. एकूण १७ संचालक पदाच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. रवींद्र रंगनाथ जाधव व संतोष घोटणे बिनविरोध निवडले आले.
विजयी उमेदवार : शरद सोनवणे, शंकर पिंगळे, संतोष चव्हाण, संजय चव्हाण, चंद्रकांत वऱ्हाडी, हरिश्चंद्र थोरात, विजय शेळके, सुनील चव्हाण, विकास दाभाडे, नीलेश बोरचटे, गणेश पोखरकर, संतोष डुंबरे, शिल्पा मोरे, वर्षा चव्हाण, भास्कर डोके.