पिंपळगाव खडकी येथे आज रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळगाव खडकी येथे
आज रक्तदान शिबिर
पिंपळगाव खडकी येथे आज रक्तदान शिबिर

पिंपळगाव खडकी येथे आज रक्तदान शिबिर

sakal_logo
By

मंचर, ता. २८ : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ६६व्या वाढदिवसानिम्मित पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव)येथे शनिवारी (ता. २९) सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, किल्ले बनवा व रांगोळी स्पर्धा, संध्याकाळी ४ वाजता निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, संध्याकाळी ७ वाजता होम मिनिस्टर आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मथाजी पोखरकर यांनी दिली. रक्तदात्यास अथवा त्याच्या नातेवाईकास वर्षभरात रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्तपिशवी मिळेल. रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे शिबिराचे आयोजक संदीप बांगर यांनी सांगितले.