आदिवासी भागातील नागरिक हळहळले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी भागातील
नागरिक हळहळले!
आदिवासी भागातील नागरिक हळहळले!

आदिवासी भागातील नागरिक हळहळले!

sakal_logo
By

मंचर, ता. २ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शाश्वत संस्थेच्या संस्थापक कुसुम कर्णिक यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच आदिवासी भागातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला, मुले हळहळ व्यक्त करत होते.
कर्णिक यांच्या मंचर येथील निवासस्थानी व कार्यालयासमोर गर्दी झाली होती. मंचर येथील शाश्वत संस्थेच्या कार्यालयात व्यवस्थापिका प्रतिभा तांबे व विश्वस्त सुलाताई गवारी यांच्याकडे वारंवार विचारणा केली जात होती. कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले, आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, रमेश लोहकरे, गोविंद पारधी, ढवळा गवारी यांनी कर्णिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.