मंचर बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक बंद
मंचर बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक बंद

मंचर बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक बंद

sakal_logo
By

मंचर, ता. ५ : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग मंचर बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारपासून (ता.४) बंद केली आहे. त्यामुळे मंचर शहरातून वाहतूक सुरू झाल्याने पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहन चालकांना तोंड द्यावे लागत आहे.
दिवाळीमध्ये नाशिककडे जाण्यासाठी भोरवाडी-गायमुख पासून (ता.आंबेगाव) बाह्यवळण रस्ता सुरू केला होता. तसेच पुण्याकडे जाणारी वाहतूक जुन्या पुणे-नाशिक रस्त्याने मंचर शहरातून जात होती. सध्या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक भोरवाडी-गायमुख येथे लावला आहे. शुक्रवारी संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या मंचर शहरात झाली होती. रविवारी (ता.६) रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता व वाहन कोंडी होऊ नये म्हणून नाशिककडे जाण्यासाठी बाह्यवळण रस्ता सुरु करावा.” अशी मागणी जय किसान पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल व संचालक दत्ता माशेरे यांनी केली आहे.
06800