मंचर येथे आज कर्करोग निदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे आज
कर्करोग निदान शिबिर
मंचर येथे आज कर्करोग निदान शिबिर

मंचर येथे आज कर्करोग निदान शिबिर

sakal_logo
By

मंचर, ता. १० : येथील उपजिल्हा रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी विचार मंच व लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले स्मारक समिती यांच्यावतीने महिलांमधील स्तनाचे व गर्भाशयाचे कर्करोग निदान मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता केले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी दिली.
अत्याधुनिक यंत्रणा व मोबाईल व्हॅनमध्ये तज्ज्ञ डॉक्टर निदान करणार आहेत. कॅन्सर टाळण्यासाठी जनजागृती होण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन केले आहे, असे सुशांत ऊर्फ बाबू थोरात व अटलबिहारी वाजपेयी विचार मंचचे तालुकाध्यक्ष प्रमोद बाणखेले यांनी सांगितले.