बटाटा वाणाच्या बाजारभावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बटाटा वाणाच्या बाजारभावात घट
बटाटा वाणाच्या बाजारभावात घट

बटाटा वाणाच्या बाजारभावात घट

sakal_logo
By

मंचर, ता.१२ : देशात उत्तर, पूर्व भागात सर्वात जास्त बटाटा लागवड रब्बी हंगामात केली जाते. पण दिवाळीत तेथे अतिवृष्टी व वादळ झाले. त्यामुळे जमिनीत वापसा नसल्याने तेथील बटाटा लागवड रखडली आहे. तेथे बटाटा वाणाला मागणी नसल्याने परिणामतः मंचर (ता.आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बटाटा वाणाची आवक वाढली आहे. प्रती क्विंटल एक हजार ते एक हजार ५०० रुपयाने बटाटा वाणाच्या बाजारभावात घट झाली आहे. स्वस्त बाजारभावात बटाटा वाण मिळत असल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे.
“मंचर येथे दिवाळीच्या अगोदर बटाटा वाणाचे बाजारभाव प्रती क्विंटलला तीन हजार ८०० रुपये ते चार हजार रुपये होता. सध्या प्रति क्विंटल दोन हजार ५०० ते तीन हजार रुपये बाजारभावाने बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध आहे.”अशी माहिती आडते संजय मोरे यांनी दिली.

बाजार समितीचे वाण विक्रीवर नियंत्रण
राज्यातील सर्वात मोठी बटाटा वाणाची बाजारपेठ मंचरला आहे. येथे ३० आडत्यांमार्फत बटाटा वाणाची विक्री बाजार समितीच्या नियंत्रणाखाली केली जाते. शेतकऱ्यांना योग्य बाजारभावात बटाटा वाण उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती व आडते सतत प्रयत्न करत असतात. यावेळी बटाटा वाणाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ”अशी माहिती बाजार समितीचे अधिकारी गणेश गावडे यांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.


मराठवाडा, विदर्भ, सातारा, शिरूर, खेड, मावळ, मुळशी भागातून बटाटा वाण खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ सुरु झाली आहे.आत्ता बटाटा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला बाजारभाव मिळेल कारण यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.
-सागर ज्ञानेश्वर थोरात, बटाटा आडते कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता.आंबेगाव)

महिना आवक पिशव्या बाजारभाव (प्रती क्विंटल)
ऑगस्ट १८ हजार तीन हजार ५०० ते चार हजार २०० रुपये
सप्टेंबर २९ हजार ५०० तीन हजार २०० ते चार हजार २०० रुपये
ऑक्टोबर ३९ हजार तीन हजार ५०० ते चार हजार २०० रुपये
नोव्हेंबर ४३ हजार ५०० दोन हजार ५०० ते तीन हजार रुपये
..............
06848, 04503