चांडोली, पिंपळगावात ऊसतोडणी थांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांडोली, पिंपळगावात
ऊसतोडणी थांबविली
चांडोली, पिंपळगावात ऊसतोडणी थांबविली

चांडोली, पिंपळगावात ऊसतोडणी थांबविली

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द व पिंपळगाव येथे सुरू असलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद केली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. १७) व शुक्रवारी (ता. १८) राज्यात सर्वत्र ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन जाहीर केले आहे. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतोष पवार, वनाजी बांगर, वैभव तोत्रे, प्रकाश कोळेकर आदी कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन ऊसतोड व वाहतूक थांबविली.
MAC22B06907