मंचरमधील बिबट्यांचा व्हिडिओ फेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमधील बिबट्यांचा व्हिडिओ फेक
मंचरमधील बिबट्यांचा व्हिडिओ फेक

मंचरमधील बिबट्यांचा व्हिडिओ फेक

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : ‘मंचर (ता. आंबेगाव) शहरात जुन्या महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन बिबट्यांचा वावर’ हा व्हायरल झालेला व्हिडिओ येथील नसून, अन्य कुठल्यातरी भागातला आहे. याबाबत वन खात्याने पडताळणी केली आहे. पण, येथे बछडे व एक मादी आहे. वन खात्याने जनजागृती सुरू केली आहे, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले, ‘‘ज्या तरुणांनी हा व्हिडिओ व्हायरल केला, त्याला सदर ठिकाण दाखवण्याविषयी सूचित केले. पण, वारंवार विचारलं तर त्याने सांगितले की, हा माझ्या एका मित्राने पाठवला आहे. हा व्हिडिओ फेक असल्याचेही निदर्शनास आले. पण, या भागात मादी व बछडा आहे, याबाबत खात्री पटलेली आहे. युवकांनी फेक व्हिडिओ प्रसिद्ध करू नयेत, अन्यथा त्यांचे विरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल,’’
दरम्यान, सोमवारपासून दररोज रात्री वन खात्याच्या व्हॅनसह वनरक्षक पूजा कांबळे सुनंदा वाजे, पूजा पवार गायकवाड आदी या भागात जनजागृतीचे काम करत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्या संगीता बाणखेले, प्राजक्ता बाणखेले यांनीही जनजागृतीसाठी मदत केली.