आंबेगाव खरेदी-विक्री संघाच्या १९ जागांसाठी ५९ अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव खरेदी-विक्री संघाच्या
१९ जागांसाठी ५९ अर्ज दाखल
आंबेगाव खरेदी-विक्री संघाच्या १९ जागांसाठी ५९ अर्ज दाखल

आंबेगाव खरेदी-विक्री संघाच्या १९ जागांसाठी ५९ अर्ज दाखल

sakal_logo
By

मंचर, ता. १९ : आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी सोमवारी (ता. २१) व माघार ६ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मतदान १८ डिसेंबरला आहे.
शेतकरी सहकारी संस्था मंचर, डिंभे, घोडेगाव, निरगुडसर व धामणी या पाच गटांसाठी प्रत्येकी दोनप्रमाणे एकूण दहा जागा, इतर प्रकारच्या सभासद सहकारी संस्थांचे दोन प्रतिनिधी, अनुसूचित जाती जमाती एक प्रतिनिधी, महिला दोन प्रतिनिधी, विमुक्त जाती व भटक्या जमाती एक प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय एक प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासदांतर्फे दोन प्रतिनिधी आहेत. ६६२ मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. रोकडे हे काम पाहत आहेत.
खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची निर्विवाद एकहाती सत्ता आहे. खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव वाघ, जिल्हा परिषद माजी सदस्य रेवती वाडेकर, शेतमाल प्रक्रिया संघाचे माजी अध्यक्ष भरत चिखले, लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अरुण लोंढे, माजी संचालक मधुकर बोऱ्हाडे, सुरेंद्र नामदेव भोर, बाळासाहेब उत्तम बोऱ्हाडे, प्रतिभा प्रकाश कराळे, निलम सुभाष काळे, सुनंदा सुभाष काळे, जनाबाई सीताराम उगले आदींनी उमेदवार अर्ज दाखल केले आहे.