मॅरेथॉन स्पर्धेत स्वरूप, अलिषा यांची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरेथॉन स्पर्धेत स्वरूप, अलिषा यांची बाजी
मॅरेथॉन स्पर्धेत स्वरूप, अलिषा यांची बाजी

मॅरेथॉन स्पर्धेत स्वरूप, अलिषा यांची बाजी

sakal_logo
By

मंचर, ता. २२ : पेठ (ता.आंबेगाव) येथे वॉटरएड इंडिया संस्था भारत यांच्यावतीने तीन किलोमीटर ''रन फॉर हेल्थ'' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये वाकेश्र्वर विद्यालयातील (पेठ) १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्वरूप दत्तात्रेय शिंदे व अलिषा जानमोहमद शेख (दोघे इयत्ता नववी) यांनी प्रथम क्रमांक पटकविला. जागतिक स्थरावर पाणी बचत, स्वच्छता व आरोग्य जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते.
स्पर्धेचे उद्‌घाटन विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राम तोडकर, उपसरपंच मयुर काळे, शरद बँकेचे संचालक संतोष धुमाळ, पुणे जिल्हा वॉटरएड इंडियाचे समन्वयक श्वेता द्वारी, आकाश सूर्यवंशी, राजेंद्र दळवी, प्रणय पाटील, तुषार कंधारे, अर्पिता कंधारे,सलीम तांबोळी, पर्यवेक्षक शिवाजी आहेर आदी उपस्थित होते.


आंबेगाव तालुक्यातील कारेगाव, पारगाव तर्फे खेड व पेठ खेड तालुक्यातील कुरकुंडी, वाफगाव या गावातील कार्यक्षेत्रात विहीर, बोअर, यामध्ये जल पातळी वाढावी. महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व वाढण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या जनजागृती अभियानाला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- श्वेता द्वारी, समन्वयक, पुणे जिल्हा वॉटरएड इंडिया

विजेत्या विद्यार्थी : मुले द्वितीय - नैतिक हनुमंत शेंडे (आठवी), तृतीय- रितेश शंकर गावडे (नववी) मुली गट :- द्वितीय- वैष्णवी अशोक राक्षे (नववी), तृतीय - कार्तिकी भगवान येंधे (नववी). विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा शिक्षक बाळासाहेब धुमाळ, भानुदास धुमाळ, सुजय जाधव, प्रसाद एरंडे, हेमंत गाडेकर, प्रदीप वाघमारे यांनी व्यवस्था पहिली.
------------------------------------------
06933