मंचर येथील व्यावसायिकांना शरद बँक देणार कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथील व्यावसायिकांना शरद बँक देणार कर्ज
मंचर येथील व्यावसायिकांना शरद बँक देणार कर्ज

मंचर येथील व्यावसायिकांना शरद बँक देणार कर्ज

sakal_logo
By

मंचर ता. २५ : मंचर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईत अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामधून सावरण्यासाठी व पुन्हा उभारी घेण्यासाठी गरजू व्यावसायिकांना तातडीने शरद सहकारी बँक कर्ज मंजूर करणार आहे.
मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या शाखेत गरजूंना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. गरजू व्यावसायिकांनी शरद सहकारी बँकेशी संपर्क साधावा, असे आव्हान शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केले.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यामुळे हॉटेल समाधान ते जीवन मंगल कार्यालय या मार्गावरील दोन किलोमीटर अंतरातील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा भागातील १५०हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे दुकानाचे मालक व दुकानात काम करणारे जवळपास ५०० हून अधिक जणांचा रोजगार गेला. त्यामुळे बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. या व्यावसायिकांना आधार देण्यासाठी शरद सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याचे शरद बँकेचे संचालक अजय घुले यांनी सांगितले.