बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञाताकडून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद घराचा कडीकोयंडा 
तोडून अज्ञाताकडून चोरी
बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञाताकडून चोरी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञाताकडून चोरी

sakal_logo
By

मंचर, ता. १३ : ढोबीमळा-मंचर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सोसायटीच्या मागे असलेल्या बंद घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. घरमालक अनिकेत भास्कर दैने (वय. ३२ रा. ढोबीमळा, मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून लोखंडी कपाटाच्या दरवाजा तोडला होता. कपाटातील मंगळसूत्र, सोन्याची चैन, कानातील वेल, झुमके, अंगठी, नेकलेस, लहान मुलाच्या गळ्यातील पान, अंगठी, सोन्याचे डोल, चांदीचे पैंजण, लक्ष्मी मूर्ती, ब्रेसलेट चोरीला गेले. याबाबत मंचर पोलिस पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलिस निरीक्षक किरण भालेकर पुढील तपास करत आहेत.