आंबेगाव तालुक्यात अटीतटीच्या लढतींमुळे रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यात अटीतटीच्या लढतींमुळे रंगत
आंबेगाव तालुक्यात अटीतटीच्या लढतींमुळे रंगत

आंबेगाव तालुक्यात अटीतटीच्या लढतींमुळे रंगत

sakal_logo
By

मंचर, ता. १६ : आंबेगाव तालुक्यात पारगावतर्फे खेड, लांडेवाडी-चिंचोडी-शेवाळवाडी व निघोटवाडी या तीन ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत. प्रचार शिगेला पोचला आहे.

पारगावतर्फे खेड येथे सरपंचपदासाठी नवखंडबाबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार सुरेखा बाळासाहेब सावंत विरुद्ध श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार नंदा सचिन पानसरे यांच्यात मुख्य लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये सदस्यपदासाठी नवखंडबाबा पॅनेलकडून रामदास जाधव, सोनाली सावंत, प्रशांत आचार्य यांच्या विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे सुरेश अभंग, शीतल पठारे, किशोर कंगने हे उमेदवार आहेत. वॉर्ड दोनमध्ये नवखंडबाबा पॅनेलच्या गणेश चिखले, उषा पालेकर, सुनीता भागडे यांच्या विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे रामदास चिखले, वैशाली भागडे, सविता भागडे व अपक्ष श्यामराव भागडे हे रिंगणात आहेत. वॉर्ड तीनमध्ये नवखंडबाबा पॅनेलच्या बेबी कोळेकर विरुद्ध भैरवनाथ पॅनेलच्या प्रशांत पवार, सुवर्णा पवार, पुनम बागल, अपक्ष श्यामराव भागडे हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड चारमध्ये नवखंडबाबा पॅनेलचे मच्छिंद्र मनकर, त्रिवेणी मनकर, मंगल पारधी विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे अमोल मनकर, रूपाली मनकर, कल्पना दुधवडे, असा सामना आहे.

चिंचोडी- लांडेवाडीत दुरंगी सामना
चिंचोडी- लांडेवाडी, शेवाळवाडी ग्रामपंचायतीत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाच्या उमेदवार संगीता शेवाळे विरुद्ध श्री कुलस्वामी खंडेराया पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी शेवाळे यांच्यात लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या शशिकला मलिक या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर, सचिन शेवाळे, सतीश शेवाळे यांच्या विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेल गणेश शेवाळे, अशी लढत आहे. वॉर्ड दोनमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या लतिका शेवाळे, सचिन ढेरंगे, अंकुश शेवाळे यांच्या विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेलच्या पूजा शेवाळे, समीर ढेरंगे, वसंत शेवाळे, असा सामना आहे. वॉर्ड तीनमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या संदीप बोकड, अंकिता शेवाळे विरुद्ध कुलस्वामी पॅनेलच्या सुमन वाघ, रोहिणी शेवाळे, अशी लढत आहे. वॉर्ड चारमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या शांताबाई खंडागळे, शितल पानसरे विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनल सुमन वाघ, विद्या लांडे, असा सामना आहे. वॉर्ड पाचमध्ये श्री भैरवनाथ पॅनेलच्या अंकुश लांडे, आशा शेवाळे, ऊर्मिला शेवाळे विरुद्ध श्री कुलस्वामी पॅनेलच्या रविराज शेवाळे, सुनीता खंडागळे, अंजना भांगे, अशी लढत आहे.

निघोटवाडी येथे सरपंचपदासाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे नवनाथ निघोट व जय श्री कृष्ण ग्रामविकास पॅनलचे सचिन निघोट यांच्यात लढत आहे. येथे वॉर्ड एकमध्ये जय हनुमान पॅनेलच्या दीपाली निघोट, महेंद्र घुले, मनीषा मोहिते विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलचे अक्षय रेणके, कोमल थोरात, उषा चव्हाण, अशी लढत आहे. वॉर्ड दोनमध्ये जय हनुमान पॅनेलच्या सीमा निघोट, नीलेश निघोट, विनोद निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या सोमनाथ निघोट, सारिका निघोट, बाळासाहेब निघोट यांच्यात सामना आहे.
वॉर्ड तीनमध्ये जय हनुमान पॅनेलच्या वर्षा निघोट, चेतन निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या राजेंद्र निघोट, कमल पारधी यांच्यात लढत आहे. वॉर्ड चारमध्ये जय हनुमान पॅनेलच्या अरुणा चिंचपुरे, वर्षा निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या उषा चिंचपुरे, वामन जाधव, असा सामना आहे. वॉर्ड पाचमध्ये जय हनुमान पॅनेलच्या निशा निघोट, संदीप निघोट, कल्याणी निघोट विरुद्ध जय श्रीकृष्ण पॅनेलच्या संदीप निघोट सोनल सावंत, असा सामना आहे.

महिलांना मासवडी, पुरुषांना बिर्याणी
जेवनावळीचा बेत जवळपास सर्वच उमेदवारांनी आयोजित केला आहे. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे महिलांना मासवडीचे जेवण; तर पुरुषांना चिकन व मटण बिर्याणी जेवणाचा बेत आयोजित केला जात आहे. मतदारांची बडदास्त ठेवली जात आहे. सोशल मिडियावार स्टेट्सवर फोटो, व्हिडिओ व माहितीपत्रके टाकून प्रचार केला जात आहे. उमेदवारांची छायाचित्र असलेले रथ-वाड्यावस्त्यावर फिरत आहेत.