
निघोटवाडीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे नवनाथ निघोट
मंचर, ता. २० : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार नवनाथ निघोट हे विजयी झाले. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत जय श्री कृष्ण ग्रामविकास पॅनेलचे सचिन निघोट यांचा पराभव केला. येथे १३ पैकी नऊ जागा जय हनुमान व चार जागा श्री कृष्ण पॅनेलने जिंकल्या.
मंचरजवळच निघोटवाडी आहे. येथे अटीतटीची लढत झाली. निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील आदी नेत्यांनी या निवडणुकीची रणनीती तयार केली होती. हनुमान पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव निघोट, सुभाष निघोट, बाबाजी टेमगिरे, राजाराम निघोट, सुरेश निघोट यांनी केले. श्री कृष्ण पॅनेलचे नेतृत्व विपुल निघोट, अंकुश निघोट, सुमंता निघोट, राजू निघोट, खंडू निघोट यांनी केले.
येथे यापूर्वीही सरपंचपदावर नवनाथ निघोट हेच होते. सलग दोन वेळा त्यांना गावकऱ्यांनी कौल दिला आहे. दरम्यान, वर्षा सनद निघोट या दोन वेगवेगळ्या वॉर्डातून निवडणूक आल्या आहेत. त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होईल.
विजयी उमेदवार : जय हनुमान पॅनेल : महेंद्र घुले, नीलेश निघोट, सीमा निघोट, विनोद निघोट, वर्षा सनद निघोट (दोन ठिकाणी), चेतन निघोट, कल्याणी निघोट, निशा निघोट. जय श्रीकृष्ण पॅनेल : कोमल थोरात, संदीप निघोट, उषा चिंचपुरे, उषा चव्हाण.