भावडीत बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावडीत बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व
भावडीत बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व

भावडीत बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व

sakal_logo
By

मंचर, ता. २० : भावडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पॅनेलच्या कमल पंडित कातळे या विजयी झाल्या. त्यांनी कल्पना घनश्याम तेली यांचा ५४ मतांनी पराभव केला. सातपैकी सहा जागा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जिंकल्या आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली व अशोक बाजारे, महेश नवले, बाळासाहेब काळे, रमेश काळे, कैलास चक्कर, कालीदास मोरे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे सरपंचपदासाठी व सदस्यपदासाठीही कमल कातळे व कल्पना तेली यांच्यात अटीतटीची लढत झाली. पण, सदस्यपदासाठी या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १०७ समान मते पडली. त्यामुळे तहसीलदार रमा जोशी व निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. उभे यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या. देवयानी बळवंत गायकवाड या चार वर्षाच्या मुलीने सदस्यपदासाठी कल्पना तेली यांच्या नावाची चिठ्ठी उचलली. त्यामुळे त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या आहेत. लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांच्या हस्ते सरपंच कातळे व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

विजेत्या सदस्यांची नावे : उज्ज्वला काळे, चैत्राली मोरे, बाबाजी नवले, सुवर्णा कातळे, गणेश बाजारे, सोपान काळे.