अवसरी परिसरात अतिरिक्त वीजबिले आल्याने संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरी परिसरात अतिरिक्त वीजबिले आल्याने संताप
अवसरी परिसरात अतिरिक्त वीजबिले आल्याने संताप

अवसरी परिसरात अतिरिक्त वीजबिले आल्याने संताप

sakal_logo
By

मंचर, ता.२२ : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, भोरवाडी, गावडेवाडी, तांबडेमळा येथे घरगुती ग्राहकांना महावितरण कंपनीकडून अतिरिक्त वीजबिल आल्याची संताप व्यक्त होत आहे. याबाबत अनेक तक्रार ग्राहकांनी केली. ज्यादा वीजबिल कमी व्हावे म्हणून ग्राहक मंचर जवळ असलेल्या शेवाळवाडी-मणिपूर येथील उपविभागीय महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेत आहेत.
अवसरी खुर्द, भोरवाडी, गावडेवाडी, तांबडेमळा ही चार गावे व वाड्यावस्त्यावर घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या चार हजार आहे.त्यापैकी जवळपास दोन हजार पेक्षा अधिक ग्राहकांना वीज बिल आकारणी ज्यादा झाली असे त्यांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने अचूक बिल ग्राहकांना देण्यासाठी खासगी एजन्सी नेमलेल्या आहेत. फोटो काढून वापर झालेल्या रीडिंगची नोंद केली जाते. त्यानुसार वीजबिल देण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात वापर झालेल्या युनिट मीटरचे फोटो न घेताच वीजबिल दिल्याचा आक्षेप ग्राहकांकडून घेतला जात आहे. अवसरी खुर्द व मंचर कार्यालयात जाऊन वीज ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान गेली अनेक महिने वीज मीटर नादुरुस्त होते. त्यामुळे युनिटची नोंद करता येत नव्हती. पण नुकतेच महावितरण कंपनीने वीज मीटरच्या दुरुस्त्या केल्या आहेत. वापर लक्षात घेऊनच वीज बिल आकारले आहे. अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


ग्राहकांचा महावितरण कंपनीवर रोष वाढला आहे. महावितरण कंपनीतील अधिकारी वर्गाने ग्राहकांची होणारी लुट त्वरित थांबवावी. दुरुस्ती करून योग्य वीज बिले ग्राहकांना द्यावीत. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने मंचर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.
- सुरेश भोर, जिल्हाप्रमुख,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष.