
पेठ येथे आढळला अनोळखी मृतदेह
मंचर, ता. २३ : पेठ (ता. आंबेगाव) गावात फिरून भिक्षा मागणारी ५० ते ५५ वयाची मातीमंद व्यक्ती हॉटेल अजिंक्यतारा समोरील पीएमपी बस थांब्यावर झोपलेल्या अवस्थेत होती. पण वैद्यकीय तपासणीत सदर व्यक्ती मृत असल्याचे आढळून आले. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम मंचर पोलिसांकडून सुरु आहे.
सदर व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत होती. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून पेठचे सरपंच राम तोडकर, राहुल शिंदे, संतोष धुमाळ यांनी सदर माहिती मंचर पोलिसांना कळविली. पोलिसांनी सदर व्यक्तीला रुग्णवाहिकेद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या व्यक्तीचे केस आणि दाढी पांढरी असून उजव्या हातात स्टीलचे कडे आहे. राखाडी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्सची पॅन्ट त्याच्या अंगावर होती. अधिक माहितीसाठी मंचर पोलिस ठाणे दूरध्वनी क्रमांक (०२१३३) २२३१५९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.