Sat, Jan 28, 2023

जुगार चालविणाऱ्यावर
मंचर परिसरात कारवाई
जुगार चालविणाऱ्यावर मंचर परिसरात कारवाई
Published on : 23 December 2022, 3:07 am
मंचर, ता. २३ : मंचर (ता. शिरूर) येथील नगरपरिषद कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व्हॉट्सॲपद्वारे कल्याण, मटका व जुगार चालवणाऱ्या इक्बाल नदीम पठाण (वय २६, रा. मंचर) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी कारवाई करून सहा हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
नगरपरिषदेसमोर सार्वजनिक जागेत मोबाईलवर कल्याण मटका जुगार सुरू असल्याची व तेथे गर्दी आहे, अशी माहिती समजल्यानंतर पोलिस ताबडतोब घटनास्थळी गेले. पोलिस आल्याचे पाहून अनेकांनी तेथून धूम ठोकली. पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यातील पोलिस जवान फिरोज मोमीन यांनी दिली.