आंबेगाव खरेदी विक्री संघ बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव खरेदी विक्री संघ बिनविरोध
आंबेगाव खरेदी विक्री संघ बिनविरोध

आंबेगाव खरेदी विक्री संघ बिनविरोध

sakal_logo
By

मंचर, ता. २९ : आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक संचालक मंडळ (सन २०२२-२७) निवडणूक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. संचाकालांच्या सर्व १९ जागा बिनविरोध झाल्या. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
मंचर येथे सन १९५८ मध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना झाली. संचालकांच्या १९ जागांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, प्रकाश घोलप, गणपतराव इंदोरे, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर आदी कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकार) पी. एस. रोकडे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

बिनविरोध निवड झालेले : भगवान रामभाऊ वाघ, जिजाराम दत्तात्रेय येवले, मधुकर रामचंद्र बोऱ्हाडे, नवनाथ शंकर हुले, अरुण महादेव लोंढे, दत्तात्रेय दादाभाऊ कोकणे, फकिरा गोविंद आदक, पोपट कोंडिबा पोखरकर, बाळासाहेब उत्तम बोऱ्हाडे, सोपान गणपत नवले, निलम अनिल वाळुंज, समीर प्रभाकर थोरात, संतोष कोंडिभाऊ सैद, श्‍यामराव होनाजी बांबळे, प्रतिभा प्रकाश कराळे, जनाबाई सीताराम उगले, सुगंध बाबूराव पोंदे, ज्ञानेश्वर जनाजी घोडेकर, मनोजकुमार कोंडिबा रोडे पाटील.

आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे कामकाज पारदर्शक असून, शेतकऱ्यांना सुधारित प्रमाणित बियाणे, खते व औषधांचा पुरवठा केला जातो. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन गेल्या अनेक वर्षाची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्याबद्दल सर्व सभासदांचे व माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार.
- बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना